खुलताबाद, (प्रतिनिधी): बाजार सावंगी येथील साई पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानवत (परभणी) येथे (ता. आठ) झालेल्या विभागस्तरीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या जीत खेळाची बेट राज्यस्तरीय क्रीडा स्पीन झाली आहे. पार्थ कपाटे (वयोगट १४) याने थाळीफेकमध्ये प्रथम, प्राची साबळेने (वयोगट १४) गोळाफेकमध्ये द्वितीय, तर अभिषेक साळुंखेने (वयोगट १९) गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. वरील तिन्ही यशस्वी खेळाडूंची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.
याच स्पर्धेत १७ वयोगटामध्ये माया काकडेने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. १९ वयोगटात सोनाली गायकवाडने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावत शाळेची मान उंचावली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष किशोर नलावडे, प्राचार्य गोपाल अधाने, उपप्राचार्य गिरधर जाधव, मुख्याध्यापक रामेश्वर मते यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












